बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असुन सैलानी, पिंपळगाव सराई, रायपुर, पांगरी व साखळी खु येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तसेच नागरीक विविध शासकीय व शेतीपुरक कामांसाठी बुलढाणा येथे ये-जा करीत असतात. तसेच सैलानी बाबा दर्गाह देशभरात प्रसिद्ध असल्याने भाविकांची सतत वर्दळ बुलढाणा - सैलानी रस्त्याने असते. परंतु बुलढाणा-सैलानी रस्त्यावर पांगरी शिवारात २ मोठ्या गिट्टी खदाणी महसूल विभागाच्या परवानगीने सुरु असून सदर गिट्टी खदाणीमधुन गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर जड वाहनातुन वाहतुक सुरु असते.
बुलढाणा ते रायपुर हा रस्ता १०/१२ टन भारचलन क्षमतेचा असून या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहनाने गौणखनिजाची वाहतुक सर्रास होत आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे लहान वाहने जसे, अपे, टु-व्हिलर, छोटी स्कुल व्हॅन, छोटी चारचाकी वाहने यांना सदर रस्त्यावरुन तारावरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावर खड्डे पडल्याने दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावातील नागरीक तसेच विद्यार्थी पांगरी मार्गे बुलढाणा न येता मातला-केसापुर-हतेडी मार्गे बुलढाणा येथे येतात. त्यामुळे नागरीकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर दोन वर्षा पूर्वी शासकीय कर्मचा-याचा सुध्दा अपघातापमध्ये मृत्यु झालेला आहे तसेच वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून सुध्दा आजपर्यंत सदर रस्त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. करीता जो पर्यंत रस्त्यांचे नविन काम होत नाही तो पर्यंत सदर रस्त्यावरील दोन्ही गिट्टी खदाने बंद ठेवण्यात यावी व नविन गिट्टी खदानाला परवानगी देण्यात येऊ नाही जेणे करून रस्त्यावर जिवीतहानी किंवा अपघात होणार नाहीतसेच रस्त्यावरील जड वाहतुक बंद नाही केली तर भविष्यात विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची काही जिवीतहाणी झाल्यास त्यास महसूल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा हे सर्वस्वी जबाबदार राहील.असे निवेदन शिवदूत नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व जिल्हा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले.सदर रस्त्याचे नविन बांधकाम तात्काळ ४० ते ५० टन भारक्षमता असलेला सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावे. अन्यथा संबंधीत गावांतील नागरिकांच्या समवेत रस्त्यावर रस्तारोखो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी अनूप श्रीवास्तव, ओम प्रकाश शर्मा, भागवत शिरसाट, सुमंत इंगळे, विवेक घाडगे, अतुल सिरसाट, मनोज पाटिल, हर्षल पाटिल, शंकर पाटील,अनेक शिव सैनिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments