मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर शहरातील शेतकरी भवन येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डिगांबर खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे यांनी केले, सहाय्यक गटविकास अधिकारी डि.एम जाधव, गटविकास अधिकारी डिगांबर खरात यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला सरपंच संघटनेचे अरुण दळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी,डि.ए. जाधव, विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, शिवाजी गवई, शिवाजी पंडागळे सहा आदी मान्यवर व सरपंच, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सहाय्यक सह आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments