लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुधवत, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात व मा.जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, उद्धवा साहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ११ सप्टेंबर रोजी तहसील समोर जन सुरक्षा विधेयक कायदा विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने जन आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक - २०२४ हे घटना विरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व्हावी व हुकूमशाही यंत्रणा बळकट व्हावी हाच कुटील हेतू या विधेयकाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही व बळाचा वापर करून त्यांचे विरूध्द खोट्या कारवाया करण्यात येतील अशी भीती विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे. सर्वसामान्य नागरिक तसेच समाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यांच्या मध्ये या विधेयकामुळे प्रचंड असंतोष व भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.तरी सदर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटना विरोधी व लोकशाही बाधक असून हे विधेयक रद्द करण्यारत यावे. या करीता हे निवेदन देण्यात आले यावेळी माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे,माजी नगरसेवक शेख राऊफ भाई, माजी नगरसेवक सतीश राठोड, शेख करामत शेख गुलाब, माजी नगरसेवक शेख असलम शेख कसम, विजय मोरे, तानाजी मापारी,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे,युवा सेना प्रमुख जीवन घायाळ, युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने ,सौ शालिनी मोरे,, शेख सज्जात शेख करामत, सौ तारामती जयभाय, एजाज खान, तानाजी अंभोरे, लुकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर,शंकर कोकाटे, शुभम चाटे, मोशीन शहा, एकबाल कुरेशी, संभाजी कोकाटे, तुकाराम राठोड, अप्पा शिंदे, कैलास जावळे, भीमा पवार, नारायण नरवाडे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments