मुंबई, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या सततच्या प्रकोपांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पिकांचे नुकसान तर झालेच, परंतु त्यासोबत त्यांच्या कष्टांचे स्वप्न, संसाराची घडी आणि भविष्याची आशाही अक्षरशः पाण्यात गेली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निवेदन पाठवले असून, त्यात त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर जुन्या कर्जाचा डोंगर आहे. नवीन कर्ज घेण्याची ताकद नाही आणि जुने फेडण्याची परवड नाही. अशा वेळी कर्जमाफी हा त्यांच्यासाठी जीवनदायी श्वास आहे. त्यांनी राज्य सरकारकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments