Type Here to Get Search Results !

मोबाईल चोरणाऱ्या महिलेस अटक, मोबाईल सह 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 


लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

लोणार शहरातील बस स्थानक येथे बसमधून खाली उतरत असताना प्रवाशाच्या खिशातील मोबाईल लंपास करणाऱ्या महिलेला लोणार पोलिसांनी अटक केली आहे. 

दिनकर भगवान गुंड हे छत्रपती संभाजीनगर येथून 10 सप्टेंबर रोजी बसने लोणार येथे आले होते. दरम्यान, बसमधून खाली उतरत असताना त्यांचा 10 हजार रुपये किंमत असलेला मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने परिसरातील विविध ठिकाणी शोध घेतला. याचवेळी बसस्थानक परिसरात एक महिला संशयितरित्या आढळली.महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता ज्ञानेश्वरी विकास काळे असे महीलेचे नाव असून चोरीचे 2 मोबाईल किंमत 20 रुपये आढळून आल्याची माहिती 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सदरची कारवाई ठाणेदार मिनिष मेहेत्रे यांच्यासह पोलिस पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments