बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 2,779 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 4,253 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ प्रलंबित ई-केवायसी, आधार सीडिंग व बँक खाते DBT Enable करावे. इच्छुक शेतकरी India Post Payment Bank मध्ये खाते उघडून ते आधार संलग्न करून DBT सक्षम करू शकतात.योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वार्षिक 6 हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत ई-केवायसी व आधार सीडिंग न केल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या तालुका कृषि कार्यालय, कृषि सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता केले आहे.

Post a Comment
0 Comments