बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
जालना येथील युवकांनी क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर, बुलडाणा येथे ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने राम जाधव, संदेश राठोड, सुनील चव्हाण, जितेंद्र राठोड, शरद वाहक, निलेश राठोड, दत्ता राठोड यांच्यासह अनेक तरुणांचा समावेश आहे. शंभु सावरगाव परिसरातील या युवकांचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बिल्ला लावून 'क्रांतिकारी' परिवारात स्वागत केले.
यावेळी लोणार तालुकाध्यक्ष सहदेव लाड,युवा नेते अमोल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या तरुणांच्या प्रवेशामुळे शेतकरी चळवळीला नवे बळ मिळाले असून, भविष्यात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिक ताकदीने लढा उभारला जाईल, असा निर्धार यावेळी केला.

Post a Comment
0 Comments