मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील तसेच मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती सागर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या मेहकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी सागर पाटील यांची नियुक्ती पत्राद्वारे मेहकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी ८ नोव्हेंबर रोजी नवनियुक्त तालुका अध्यक्ष सागर पाटील यांना नियुक्ती प्रदान केले.

Post a Comment
0 Comments