मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे 15 आक्टोबर रोजी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिसाईल मॅन ऑफ इंडिया भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्ग 12 वी विज्ञानची विद्यार्थिनी सुहानी सदार ही होती.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य रमेश जाधव,शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल, कार्यक्रम प्रमुख प्रा अलंकार सुर्वे , प्रमुख वक्ते संजय गवई , संजय टेकाळे,संजय गव्हले, कु.प्रिया कुटे, निदेशक दत्तात्रय उंडाळ, सांस्कृतिक प्रमुख केशव सरकटे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख प्रा. सुर्वे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा एक खेड्यातील मुलगा ते मिसाईल मॅन पर्यंतचा जीवनपट संक्षिप्त स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर सादर केला.त्यानंतर प्रा. अलंकार सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन बनवलेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या भव्य अशा रेखाटन केलेल्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.खेड्यातील मुलगा ते मिसाइल मॅन ऑफ इंडिया आणि माजी राष्ट्रपती पद भूषवलेल्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा प्रवास प्रमुख वक्ते संजय गवई यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय निश्चित करून त्यानुसार प्रयत्न करत राहिले तर यश निश्चितच प्राप्त होते त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि वाचनाची गोडी आपल्या जीवनामध्ये रुजवली पाहिजे असे मनोगत प्राचार्य रमेश जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य रमेश जाधव यांनी प्राध्यापक सुर्वे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेखाटन केलेल्या भव्य अशा प्रतिमेसाठी त्यांचे कौतुक करून रोख 1 हजार रुपये बक्षीस दिले व शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल सर यांनी सुद्धा 501 रुपये बक्षीस दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की , प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात आपल्याला वेळ मिळेल तसा वाचनाचा आनंद घेतलाच पाहिजे वाचनाने मनुष्याचे जीवन बहुआयामी बनते.प्राध्यापक सुर्वे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पायल ससाने तर आभार प्रदर्शन कु.रूपाली भालेराव हिने केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू - भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments