लोणार,सागर पनाड
माहेरी गेलेल्या पत्नीला विचाराना करण्यासाठी गेलेल्या सैनिकांस व त्याचे वडीलास सासर कडील मंडळीनी मारहाण केल्याची फिर्याद सैनिकाने दिल्या वरुण चिखली पोलीस स्टेशन ला ता. २४ ऑगष्ट ला समोर आली .
प्राप्त माहिती नुसार सैनिक निलेश गणेश वानखडे रा. सोमठाणा ता. लोणार यांणी चिखली पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की,माझे लग्न २०२३ मधे सावरगाव डुकरे येथील गजानन घेवंदे यांच्या मुली सोबत झाले असुन मला मुलगी आहे. मी आज पंधरा दिवस रजेवर घरी आलो मी ड्युटी वर असतांना गेल्या एक महिन्यापुर्वी माझी पत्नी आणि माझे आई वडीलंसोबत भांडण करून तिचे आई वडीलांना बोलावुन माहेरी निघुन गेली होती .ता. २४ ऑगष्ट ला मी घरी आल्यावर पत्नीला फोन केला परंतु माझे सासरे यांनी उचलला व मला धमकी दिली " तु माझे गावात आला तर तुझे हातपाय तोडु " तुझया सारखे फौजी खुप पाहीले " म्हणुन मी व माझे वडील दुपारी मोटारसायकलने माझी सासरवाडी सावरगाव डुकरे येथे सायंकाळी ७ वाजता आलो असता सासरे गजानन घेवंदे व चुलत सासरा भारत घेवंदे यांनी काही एक विचार न करता मला व माझे वडीलांना मारहाण सुरु केली तेव्हा सासरे यांचे हातात विळा किंवा चाकु होता अंधार असल्याने दिसला नाही ते मला मारणार तोच मी माझे डावे हाताने धरला तर माझे अंगुठा व तर्जनीचे बोट कापुन जखम झाले व रक्त निघाले तेव्हा त्यांनी मला व माझे वडीलांना लाथां बुक्यांनी मारहाण सुरु केली तेव्हा गावातील लोकांनी अम्हाला त्यांचे तावडीतुन सोडविले. माझे सासरे व चुलत सासरे यांनी मला माझे पत्नीला भेटण्यासाठी गेलो असता मला भेटु न देता मारहाण करुन जख्मी केले व शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली. ते केव्हा काय करतील याचा नेम नसुन त्यांचे पासुन माझे जिवीतास धोका निर्माण झाला असल्याची फिर्याद सैनिक निलेश वानखेडे यांनी दिल्यावरुण सासर कडील मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करीत आहे .

Post a Comment
0 Comments